कोरची
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आणि एकलव्य आदर्श निवासी शाळा कोरची यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक २६ जानेवारी२०२४ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एकलव्य आदर्श निवासी स्कूलच्या वतीने उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. गणराज्य दिनाचे औचित्य साधून शासकीय आश्रय शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल उईके, सदस्य मनीतराम मडावी व विशेष अतिथी म्हणून कोरची येथील नगराध्यक्ष श्रीमती हर्षलता भैसारे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. तथा शाळेतील मुख्याध्यापक उमाकांत ढोक, प्रा.हरेश कामडी, प्रा.अरुण कायंदे, रमेश रामटेके, प्रा.अभिमन्यू वाटघुरे, प्रा.मनोज गजभिये, प्रा.दिलिप कचलामी, प्रा.यामिनी देशमुख, भैयालाल कुरसंगे, गुरुदास मेंढे, संतोष सहारे, अधिक्षक विरेंद्र मडावी, देवेंद्र मडावी, डाकराम ठाकरे, गिता राऊत, सुषमा अंबोने, लीना वाटघुरे, मनोज आचार्य, प्रशिल जांभूळकर, निलिमचंद कापगते, संतोष पचारे, अश्विनी कापगते, भारती चौधरी, दिक्षा टेभुर्णे, महेश उरकुडे, सुधाकर पुसाम, अधिक्षक निखिल दाणे, अधिक्षिका सिमा कुरेकार, शिवानी झोडगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाकराम ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद पिलारे, सुधीर सातपुते, कन्नाके, अविनाश भुसारी, त्र्यंबक आश्वले आणि शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आदींनी सहकार्य केले.