राष्ट्रीय मतदार दिनी विविध स्पर्धांमध्ये जि.प. शाळेचे सुयश

 

कोरची

कोरची येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावून बक्षीस मिळवीले आहें.

तहसील कार्यालय कोरची अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धां, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. रांगोळी, निबंध आणि चित्रकला स्पर्धा या तिन्ही स्पर्धा मध्ये जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक पटकावून बक्षीस मिळवले.

कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम, कोरची पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अमोल फडतरे आणि एसआरपीएफ. पोलीस निरीक्षक चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी ला तहसील येथिल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. त्यामुळे बक्षीस मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी काटेंगे, शिक्षिका कांता साखरे, आरती चांदेकर, मेघा बुराडे शिक्षक मारोती अंबादे, महेश जाळे, विनोद भजने यांनी स्पर्धा व विविध कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.