( गुरुदक्षिणा ) – न्यायाधीश पांडुरंग खुणे –
कोरची प्रतिनिधी /
विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. तो देशाचा आधारस्तंभ, सुजाण नागरिक होणार आहे. आणि त्यांना घडविणारे शिक्षक हे खरे विश्वगुरु आहेत. असे प्रतिपादन आश्रम शाळा कोटरा येथे दिनांक २७ जानेवारीला झालेल्या स्नेहसंमेलन तथा बालक पालक मेळाव्या प्रसन्गी भंडारा जिल्हा सत्र न्यायाधीश पांडुरंग खुणे यांनी केले. स्व. मिनाताई ठाकरे शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित अनुदानित माँसाहेब माध्यमिक आश्रमशाळा कोटरा येथे दिनांक २७ व २८जानेवारीला स्नेह संमेलन तथा बालक पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पांडुरंग खुणे, उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, प्रमुख अतिथी म्हणून कोरची तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, संस्था अध्यक्ष किशोर वानखेडे, सचिव हर्षा वानखेडे, सहसचिव अभिषेक काळमेघ, कोषाध्यक्ष अनिल वानखेडे, सदस्य प्रियंका काळमेघ, विद्या वानखेडे, ललिता काळमेघ, समिक्षा वानखेडे,ताई वानखेडे, आकाश वानखेडे, कोटरा येथील सरपंच शांतीबाई मडावी,माजी सरपंच तुलाराम मडावी, राहुल मलगाम, नंदुभाऊ वैरागडे, राहुल अंबादे, मुख्याध्यापक सुनील अवसरे, प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे, लेखिका, कवयित्री संगिता ठलाल, राष्ट्रपाल नखाते, संताराम मडावी, विलास गावंडे, शोभा गावंडे,मन्सराम मडावी, प्रेम मडावी, धरमसाय कोवाची,देवचन्द दखने,धृपाल नैताम, उपसरपंच मधुकर मेश्राम, डॉ नरेश देशमुख, रमाकांत निंबेकर, डॉ सदाशिव गहाणे,राजू दुगा, रामनाथ कोरचा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील अवसरे यांनी केले. यावेळी सुरेंद्रसिह चंदेल म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी हा दुर्गम, डोंगर खोर्यातील आहेत. त्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण येथेच मिळाले पाहिजे.त्यावर संस्था अध्यक्ष किशोर वानखेडे म्हणाले, की पुढे बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय व त्यानंतर टप्प्याटप्प्याने पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे केली जाईल. ही शाळा गडचिरोली जिल्ह्यात नंबर वन ची शाळा बनविण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व गोष्टी दर्जेदार राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संगिता ठलाल,तुलाराम मडावी, नंदू वैरागडे, राहुल अंबादे, प्रतापसिंह गजभिये, विलास गावंडे, शांतीबाई मडावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे येथे झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेत सहभागी झालेला खेळाडू रमेश पागू पुन्गाटी,, सरपंच शांतीबाई मडावी, ग्यारापतीचे अब्दुल अखिल शेख यांचे शाल श्रीफळ देऊन मान्यवरांनी सत्कार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शहारे व रमेश नान्ने यांनी संयुक्तपणे केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधिक्षक मुकेश हरडे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य जनता व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अरविंद काशीवार, नमो मेश्राम, सुधाकर कामडी,भरत लन्जे, रमेश शहारे, रमेश नान्ने, मोतीराम मोहुर्ले, देवानंद पुराणकर, खिरेश ढवळे, गणेश हिचामी, मुकेश हरडे, यामिनी हलामी, राकेश कुलसन्गे, घनश्याम वनवे, सुशील मस्के, भुपेश कामडी,बलियार मडावी, परमेश्वर गायकवाड, रामदास उईके,नोबिल कहारकर,देवका ठाकरे, शोभा मेश्राम, दिशा बुरे, नितीन पितुलवार ,राजू चौधरी व सर्व विद्यार्थी,व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.