क्रीडा स्पर्धांमुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत: आमदार कृष्णा गजबे 

 

 

बिहीटेकला येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

 

तालुका प्रतिनिधी कोरची 

  ‌‌‌‌ विद्यार्थ्यांना शिक्षणासह खेळ महत्त्वाचे आहे. खेळामुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. नियमित खेळ खेळल्याने खेळभावना वृद्धिंगत होण्यास मदत होते असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

     ‌‌‌बिहीटेकला येथे तालुकास्तरीय बालक्रीडा, कला व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन आमदार कृष्णाजी गजभे त्यांच्या फीत‌‌ कापुन उदघाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच किशोरजी नरोटे प्रमुख अतिथी माजी सरपंच जगदीश कपुरडेरीया, कांग्रेस पाटीँ तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम, वडसा कॉंग्रेस अध्यक्ष परसराम टीकले, गटशिक्षणाधिकारी अमित दास, समाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, जिंतेद्र सहारे, राष्ट्रपाल नखाते, राकेश मोहुले, राहुल अंबादे, विनोद कोरेटी, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, सेवानिवृत्त शिक्षक रामकृष्ण मिरी, ग्यानसिंग काटेंगे, मनोहर कोराम, प्रफुल सोनफुल, संतोष बघवा, वीरेंद्र सेवा, रामलाल मुलेटी, अनिता कपुरडेरीया संतोषी बखर, गीरीष अडभैया, सतोषी भक्ता, मंदाताई आवारी व सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

  ‌‌‌‌‌ पुढे बोलताना आमदार कृष्णाजी गजबे म्हणाले की, तालुक्यातील विद्यार्थी खेळामध्ये मागे नाहीत. अनेक स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा‌ व राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली पाहीजे‌‌ व विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी अशा शालेय बाल क्रीड़ा सम्मेलनाचे आयोजनात मोठा हातभार लागतो. यावर्षीचे आयोजन हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक उत्तम होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली या तालुकास्तरीय बालक्रीडा कला व‌ सांस्कृतिक संमेलनात ५ केंद्रातील खेडाळूचा सहभाग होता. ५ केंद्रातील विद्यार्थी विविध प्रकारची झाकी सादर करुण मान्यवराचे मने जिंकली आहें.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अमित दास, 

संचालन रवींद्र गेडाम व वर्षा चुधरी तर आभार राजेश परशुरामकर केंद्रप्रमुख यांनी केले.