रोजगार हमी योजनेतून कूकडेल येथे 109 मजुरांना रोजगार उपलब्ध

 

 

कोरची मुख्यालया पासून अंदाजे 7किमी.वर असलेल्या कूकडेल येथे दिनांक 17/02/2024 ला सकाळी 8:00 वाजता कम्पर्मेंट नं.499मध्ये 1500 रनींग मीटर T.C.M. नाली कामाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीकांत ठाकरे वन परीक्षेत्र अधिकारी बेडगांव, डी. आर. ढोरे राऊंड ऑफिसर बेडगांव, एस. डी. मसराम वनरक्षक दवंडी बिट,रमेश तुलावी सरपंच ग्रामपंचायत दवंडी भारत नुरुटी पोलीस पाटील कुकडेल, मन्साराम नुरुटी ग्रामसभा अध्यक्ष, यशवंत सहारे ग्रामसभा सचिव कुकडेल राजकुमार नंदेशवर रोजगार सेवक, दिपक हलामी नव नियुक्त रोजगार मेट व ग्रामसभा कुकडेल येथील 109 मजूर उपस्थित होते.