गडचिरोली –गोंदिया व कोरची -कोटगुल गडचिरोली ( दोन्ही मार्गे सकाळी ) बस सुरू करा

 

 

कोरची तालुका हा आदिवासी बहुल नक्षल ग्रस्त असून या तालुक्यात बस सेवा 

प्रमाणात असल्यामुळे तालुक्यातील व्यावसायीक व नागरीक तसेच कर्मचा-यांना,जण प्रवासी लगतच्या कोटगुल मार्गाने सकाळी‌‌‌ जाण्यासाठी एक बस नाही ‌‌. व गोंदिया जिल्ह्यात ये – जा प्रवास करण्यासाठी एकही बस फेरी उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचा-यांना खाजगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागतो.तसेच व्यापारी वर्ग व नागरीक गोंदिया येथून व्यवसाय साधन व आपात्कालीन रूग्नालयात जाण्यासाठी खाजगी वाहनांची वाट बघत असतात .या मार्गावर साकोली आगाराची फक्त एकच बस असल्याने प्रवाशांना जिव मुठीत धरून खाजगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागतो. बेडगांव‌ कोटगुल‌ मार्गाने सकाळी रहजदारी गडचिरोली बस व कोरची ते देवरी या दोनही मार्ग रहदारी करीता सहज असून सुद्धा गडचिरोली डेपो आणि लगतच्या गोंदिया डेपो वरून एकही बस उपलब्ध नसल्याची खंत नागरिकात आहे. यावरून प्रवाशांसाठी शासन उदासीन आहे असे दिसते.लोक प्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधी,यावर उपाययोजना करावेत याकडे नागरिकांचे लक्ष वेधून आहे.तरी सदर आ्वश्यकतेनुसार त्वरीत बस फेरी सुरू करण्यात यावे असे नागरिकांनी मागणी केले आहे.