धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेटकाटी विद्यालयात 12वीच्या विद्यार्थ्याना निरोप

 

कोरची :-तालुक्यातील धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक बेतकाटी विद्यालयात 10वीच्या व 12वीच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्यध्यापक पांडुरंग नागपुरे होते.तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून वनश्री महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप चापले, पारबताबाई विद्यालयातील शिक्षक सुरज हेमके, बेतकाठी चे सरपंच कुंतीबाई हुपुंडी, मिसार ,उपसरपंच सुरेश काटेंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तिलक जी सोनवानी ,घनश्याम मारगाये ,सुरज गुरुभेलिया, अरविंद बनसोड, रघुनाथ बडोले आदी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग नागपुरे यांनी विद्यार्थी जीवनाविषयी मार्गदर्शन करून येणाऱ्या परीक्षामध्ये कॉपीमुक्त राहण्याकरिता मार्गदर्शन केले .

निरोप समारंभा प्रसंगी वर्ग दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यानी त्यांना येणारे शाळेतील अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थीनी स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी जिद्द , चिकाटी व मेहनत अभ्यास करून परीक्षेत यश संपादन करून भविष्यात यशस्वी व्हावे , असे आव्हान प्रदीप चापले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आर ए कापगते यांनी केले.तर संचालन होमराज बिसेन तर आभार नूतन कुमार कचलाम यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग नववीचे व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले सहकार्य केले.