कोरची :-
तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून तालुक्यात सतत चार दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही पाण्याखाली गेली असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्याची कमायी शेतीवर लावणाऱ्या शेतकऱ्यांवर आता उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे सदर विषय हे गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार कोरची यांचे मार्फत निवेदनातून करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी कोरचीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे, नगरसेवक धनराज मडावी, नगरसेवक धरमसाय नैताम, जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वसीम शेख, रूखमन घाटघुमर, रामलाल बोगा आदि यावेळी उपस्थित होते.