पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत पारबताबाई विद्यालयात मुलीच्या सुरक्षा संबंधी सूचना व प्रेरणादायी मार्गदर्शन

 

 

 

कोरची:-

गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार शक्तीचा कायदा आणत असताना दुसरीकडे महिला आणि मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस कर्मचारी यांचे ‘अल्पवयीन मुलींच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगाने घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचना, या विषयावर पारबताबाई विद्यालय कोरची येथील मुलींच्या सुरक्षा व कायदेविषयक व होणारे सायबर क्राईम याविषयी महिती व यासंबंधी आढावा घेण्यात आला यावेळी विद्यालयातील वर्ग पाचवी ते दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन करण्यात आले. अनेकदा ओळखीचे लोक असल्याने त्यांचा स्पर्श बॅड असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला सेफ आणि अनसेफ टच काय आहे. गुड टच आणि बॅड टच यासंबंधी सविस्तर माहिती तसेच वयात येताना होणाऱ्या शारिरीक बदलानुसार घ्यावयाची खबरदारी, मुलींच्या छेडछाड व अत्याचार संदर्भात कायदेशीर तरतुदी संबंधी सूचना देण्यात आल्या.

 

सदर मार्गदर्शनाकरीता पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे ,पोलीस उपनिरीक्षक देशमुख, व मुक्तीपत संघटिका नीला किन्नाके आदींनी सखोल मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी, कृष्णामाई खुणे ,वसंत गुरनुले, निर्मला मडावी, कैलास अंबादे, पराग खरवडे,मुंशीलाल अंबादे , प्रल्हाद बागडेरिया याप्रसंगी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक वसंत गुरनुले तर आभार कृष्णाबाई खुणे यांनी मानले.