तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात साजरा

 

तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात साजरा धनंजय स्मृती विद्यालयाच्या चमूची जिल्हास्तरावर निवड

 

कोरची :- तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2024 -25 धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी येथे पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य पांडुरंग नागपुरे, उद्घाटक म्हणून एकलव्य मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक देवेंद्र सिंग ठाकूर हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून गट साधन केंद्राचे साधन व्यक्ती ,योगेश शुक्ला, प्रमोद वाढनकर , विनायक लिंगायत, सुरज हेमके, नामदेव नागपुरे, कुणाल कोचे, स्वाती दहीकार, चिमूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. ह्या नाट्योत्सवात तालुक्यातील तीन शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी यांनी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे या शाळेची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.

परीक्षक म्हणून धर्मेंद्रसिंग ठाकूर, मीना चिमूरकर, स्वाती दहीकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ह्या कोरची तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवाचे आयोजन व नियोजन शाळेचे प्राचार्य पांडुरंग नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. नाट्यउत्सवाच्या यशस्वीतेसाठी गट साधन व्यक्ती योगेश शुक्ला, प्रमोद वाढनकर विज्ञान शिक्षक होमराज बिसेन , यांनी सहकार्य केले.

 

या नाट्य उत्सवात धनंजय स्मृती विद्यालय कोरची यांना विजय घोषित करून या शाळेची जिल्हास्तरीय नाट्य उत्सवासाठी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमप्रभू मुंगणकर व प्रास्ताविक विनायक लिंगायत विषय साधन व्यक्ती पं स.कोरची यांनी केले, तर आभार कैलास बोरकर यांनी मानले.