कुकडेल येथे 68 वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरे

 

 

कोरची :

कोरची तालुका मुख्यालयापासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकडेल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कुकडेल येथील पोलीस भारत नूरुटी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश तुलावी सरपंच ग्रामपंचायत दवंडी, दीपक हलामी तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस कोरची, ईश्वर नूरुटी, लहानु सहारे, यशवंत सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर भारत नूरूटी पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समाज एकत्रित असणे गरजेचे आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्या जीवनात अवलंब करावे असे प्रतिपादन भारत नुरुटी यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून केले. बाबासाहेब यांनी आपल्या वयक्तिक जीवनामध्ये खूप संघर्ष केला व ते कधीही खचून न जाता प्रत्येक समस्याचे निराकरण त्यांनी केले असे वक्तव्य यावेळी सरपंच रमेश तुलावी यांनी केले. यावेळी कुकडेल या गावात नव्यानेच समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन अनिल नंदेश्वर यांनी केले तर आभार विकास सहारे यांनी मानले. संध्याकाळी सर्व समाज बांधवांकरिता जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुराव सहारे, संजय नंदेश्वर, रुपेश नंदेश्वर, मदन नंदेश्वर, विजय सहारे, शैलेंद्र सहारे, मंगेश सहारे आदींनी अथक परिश्रम घेतले.