संस्कार आणि संस्कृती जोपासून एकोप्याने राहणार तोपर्यंत आपल्या ढिवर, केवट समाजाचा विकास होणार नाही :-प्रा. बाबुराव शेंडे

 

 

आरमोरी :-

तालुक्यातील रामपूर चक येथे अश्विन शुक्ल शरद पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.त्या कार्यक्रमाला अध्यक्ष खेळकर तालुका अध्यक्ष आरमोरी, मार्गदर्शक प्रा. बाबुराव शेंडे, सुधाकर खरकटे, उपसरपंच प्रवीण ठेंगरी, देवराव प्रधान, सदस्य सौं. पूजा गुरनुले, पोलीस पाटील सौं. कामिनी राऊत, सदस्य सौं. रेखा राऊत, धनंजय बांडे, रूमदेव सहारे, लोकेश माकडे तसेच रामपूर गावातील केवट, ढिवर समाज आणि रामपूर वाशी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना संस्कार आणि संस्कृती जोपासून एकोप्याने राहणार तोपर्यंत आपल्या ढिवर, केवट समाजाचा विकास होणार नाही :-प्रा. बाबुराव शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले 

             कार्यक्रमाचे आयोजन ढिवर व केवट समाजाचे अध्यक्ष रवी सरपे, शामराव राऊत आशिष सोपानकर अमर सरपे रवी कलासार तसेच सर्व ढिवर समाजाच्या बांधवानी सहकार्य केले