मोहगाव येथे कोरची तालुका आदिवासी कवर समाजाच्या वतीने सामूहिक आदर्श विवाह सोहळा संपन्न

तालुक्यातील आदिवासी कवर समाजातील २१ नवं वर-वधू जोडपी विवाह बंधनात; हजारो नागरिकांची उपस्थिती

कोरची
कोरची तालुक्यातील मोहगाव येथे आदिवासी कवर समाज व सेवा संस्था खडकाघाट सोहले परिक्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक आदर्श विवाह सोहळा १०, ११ मार्च २०२३ शनिवार ला मोहगावच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याचे उदघाटक खासदार अशोक नेते, अध्यक्ष नाशिक म.रा.आ. वि. म. संचालक भरतजी दुधनांग, प्रमुख पाहुणे म्हणून देवरी पं स. सभापती अंबिकाताई बंजार, कोरची माजी भाजपा ता. अध्यक्ष आनंद चौबे, प्राचार्य देवराव गजभिये, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, माजी जि. प. सदस्य पद्माकर मानकर, नगरसेवक डॉ. शैलेंद्र बिसेन, गडचिरोली लेखाधिकारी चेतन जमकातन, सरपंचा मडावी मॅडम, माजी जि. स. रामसू काटेंगे, छ.ग. जिल्हा उपाध्यक्ष कवर समाज पितांबर आरगदुल्ला, कोरची तालुका कवर समाज अध्यक्ष भिकमजी फुलकवर, मनोज अग्रवाल, हलबिटोला अध्यक्ष अशोक फुलकवर, चिपोटा क्षेत्र अध्यक्ष जासलराम सांगसुंगवार, देशरबाई सोनकुकरा, प्रा. मुरलीधर रुखमोडे, सामाजिक कार्यकर्ता राहुल अंबादे, के डी चंद्रमा, रुखमन घाटघुमर, वार्ताहार राष्ट्रपाल नखाते, उमेश बागडेरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरची तालुक्यात आदिवासी कवर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा सन २००१ पासून सुरुवात करण्यात आला. यासाठी गोंदिया, गडचिरोली, राजनादगाव जिल्हा कवर समाजाचे संरक्षक, मार्गदर्शक डॉ मेघराज कपूर यांनी आपल्या संकल्पनेतून सदर सोहळ्याचे नियोजन केले यांच्याच मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात आला परंतु मागील दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सदर सामाजिक विवाह सोहळ्याला खंड पडला होता. यावेळी तालुक्यातील विविध गावाहुन आलेल्या २१ जोडप्याचे लग्न या सामूहिक लग्न सोहळ्यात लोकप्रतिनिधी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लावण्यात आला आहे. समाजात सामूहिक विवाह सोहळा हा बाकीच्या समाजाला आदर्श ठरणारा असून महागाईच्या काळात आई-वडिलांना मुला-मुलींचे लग्न करणे सोपे झाले असल्याचे यावेळी खासदार अशोक नेते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच सोहळ्याचे अध्यक्ष भरत दुधनांग, प्रमुख पाहुणे सभापती अंबिकताई बंजार, प्रा. मुरलीधर रुखमोडे यांनी सुद्धा आदिवासी कवर समाजाला मार्गदर्शन केले.
कोरची तालुक्यातील आदिवासी कवर सामाजामधून पाच जन शासकीय प्रशासकीय विभागात उच्च पदस्थ असून या पाच सत्कारमूर्तीमध्ये सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, लेखा अधिकारी चेतन जमकातन, सेट परीक्षा उत्तीर्ण शिक्षण जितेंद्र साहाळा, बी ए एम एस करिता निवड झालेली कु. भाग्यश्री कपाट यांचे खासदार अशोक नेते यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले. तसेच नवविवाहित २१ जोडप्याचे परिचय घेऊन त्यांना संसार उपयोगी भेट वस्तू देत शुभेच्छा देऊन आयोजकांना रोख पाच हजार रोख रक्कम दिला. आदिवासी कवर समाज कोरची तालुका आदर्श विवाह सोहळ्यात हजारो नागरिक उपस्थित असून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या विवाह सोहळ्याचं प्रस्तावना कवर समाजाचे तालुका अध्यक्ष भिकम फुलकवर, संचालन प्रा. गणेश सोनकलकी तर आभार शिक्षक आसाराम फुलकवर यांनी केला. सदर सामाजिक लग्न सोहळा यशस्वीतेसाठी कोरची तालुका कवर समाजातील पदाधिकारी सदस्य व महिला पुरुषांनी अथक परिश्रम घेतला.