कोरची नगरपंचायतकडून शहरातील विविध वार्डमधून टुल्लू पंप जप्तची कारवाई

 

कोरची
कोरची नगरपंचायतकडून टूल्लु पंप जप्त कारवाई सुरू केली आहें. कोरची शहरातील टंचाई लक्षात घेता नगर पंचायत कार्यक्षेत्रातील वैयक्तिक व सार्वजनिक नळावरील टूल्लु पंप जप्ती करण्यात आले.
या आधी शहरात मुनादी व नोटीस द्वारे पंप न लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली परंतु तरीही नागरिकांनी पंप न काढल्याने नगरपंचायतीने सदर कारवाई केली. पुढ़े उन्हाळ्याचे दिवस असल्याने मार्च महिन्यातच शहरातील पाण्याची पातळी खालावली असल्याने पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागू नये म्हणून सदर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बाबासो हाक्के यांनी दिली.
तसेच एप्रिल व मे महिन्यात सर्व नगरिकानी पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन नगर पंचायत कडून शहरातील नागरिकांना करण्यात आले. जप्ती कारवाईत शहारातील विविध वॉर्डातील 10 पंप जप्ती करण्यात आले सदर कारवाई करताना नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बी व्ही हाक्के, जयपाल मोहुले, नरेंद्र कोतकोंडावार, रवी मडावी, विजय जेंगठे, आशिष राघोते व सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.