संगीचा घरचा झाला लग्न शेवटचं, परतीच्यावेळी गेलं जीव, कोरचीतील भाजीपाला विक्रेताचं आकस्मिक निधन

 

कोरची
कोरची शहरातील वार्ड क्रमांक १६ मधील प्रतिष्ठित भाजीपाला विक्रेता हरिदासजी गुरनुले (५२) याचं आकस्मिक निधन झाला आहे. कोरचीवरून पाच किलोमीटर अंतरावर येत असलेल्या सातपुती गावातील आपल्या नातेवाईक संगीच्या घरी शनिवारी लग्नाला हरिदास गुरुनुले हे सायकलने गेले होते. लग्न आटपून परतीच्या वेळी सायंकाळी गर्मी खूप जास्त असल्याने त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागले त्यामुळे ते एका झाडाखाली सावलीत विश्रांतीसाठी सायकल एका कडेला ठेवून थांबले. परंतु यावेळी अंधार पडल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांच्या नजरेत ते काही दिसून आले नाही आणि रात्रभर झाडाखाली तळफडत बेशुद्ध अवस्थेत पडून राहिले.
रविवारी पहाटे सातपुती गावातील नागरिक त्या रस्त्याने कामाने बाहेर पडले तेव्हा त्यांना ते झाडाखाली पडून असल्याचे दिसले त्यांनी कोरचीला घरी व नातेवाईकांना माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना स्वतःच्या गाडीत घेऊन कोरची ग्रामीण रुग्णालय सकाळी ९ वाजता आणले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आशिष इटनकर यांनी प्राथमिक उपचार दिला परंतु श्वास घ्यायला त्रास वाढल्याने त्यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले परंतु या दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.
हरीदासजी गुरुले हे भाजीपाल्याची शेती करत असून भाजीपाला आपल्या अर्धांगणी शिलाताई सोबत भाजीपाला विकायला कोरची तालुक्यातील ग्रामीण भागातील गावा-गावात व आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. ह्यांना तीन मुली असून यामधील दोन मुलीचे लग्न करून दिले तर तिसऱ्या मुलीचे शिक्षण करत होते. परंतु पती अर्ध्यात सोडून गेल्याने आता मुलीचे शिक्षण अर्धांगिनी शीलाताई हरिदासजी गुरुनुले यांच्यावर पडले आहे. त्यांचा पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता कोचीणारा घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. ते अतिशय प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने माळी समाजात शोककळा पसरलेला होता.