*कोरची :-
गडचिरोली जिल्हातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा कोरची तालुका पुन्हा अनेक समस्यांचा विस्कळात असून अनेक तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरची तालुक्यात बँक ऑफ इंडिया ची प्रमुख शाखा असून बरेच लोकांचे व्यवहार या बँकेत येत असून ,या बँकेत कोटगुल पासून लोक येत असतात. कोटगूल कोरची चे अंतर 40किमी पेक्षा जास्त असून ,बँकेत नेटवर्क बरोबर राहत नसल्यामुळे व्यवहार करतांना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बरेच लोक हे बँकेत व्यवहार करण्यासाठी लाइनित लागतात. परंतु नेटवर्क बरोबर नसल्यामुळे रिकामे तास -तास लाईनित लागल्यावरही रिकामे परत जावे लागत आहे. यामुळे बऱ्याच लोकांना आर्थिक ,शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आपल्या देशात साजरा करीत असून ,एकीकडे नेटवर्क व विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक गाव अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांशी विचारणा केल्या असता, कोरची तालुक्यात नेटवर्क बरोबर राहत नसल्यामुळे व्यवहार करण्याकरिता बराच कालावधी लागत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.