कोरची :- मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेला बेळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेळगाव येथे बाहेर गावावरून शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. गरजू अठरा विद्यार्थिनींना मानव मिशन अंतर्गत मोफत सायकलींचा लाभ देण्यात आला. यात 2022 -2023 या शैक्षणिक क्षेत्रातील दुसर्या टप्यात 11 विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका आशा सोनकुसरे, प्रतिभा प्रधान अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, चेतनंद किरसान सरपंच बेळगाव, देवीदास गुरनूले उपसरपंच बेळगाव, दुधे ग्रामपंचायत सचिव, राकेश पारडवार तंटामुक्ती अध्यक्ष, सरिता धनगाये , मंगला गोटा ,श्रीहरी उसेंडी सर , विजय मसराम सर , राकेश गायकवाड, वरखडे सर, विद्या उंबरकर, प्रा. गणेश सोनकलंगी. प्रा. जया मडावी,प्रा. काजल मडावी, रूपाली कराडे, शीला नैताम, जिजाबाई खुणे, व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थिनींना सायकलीचे सदुपयोग करून नियमित शाळेत यावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापिका यांनी केले.