कोरची::मुक्तीपथ अभियान अंतर्गत नेहमीच विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. तंबाखूजन्य आणि नशाजन्य पदार्थ सेवन केल्यास आरोग्य विनाशाकडे मार्गक्रमण करू शकते. म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरचीच्या प्रांगणात ‘यमराजाचा फास ‘लघुपट मुक्तीपथ टीमने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना दाखविले. मा. नीळा कन्नाके मॅडम यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथील शिक्षक मारोती अंबादे, महेश जाळे, कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, आरती चचांदेकर, सोनाली सोरते यांनी सहकार्य केले