26विद्यार्थिनींना सायकल वाटप

कोरची:- येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात बाहेर गावाहून शिक्षणासाठी शाळेत ये-जा करणाऱ्या 26 विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण सोमवारी करण्यात आले.
मानव विकास मिशन योजनेतून विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात आला. कोरची येथे कोचिनारा , सातपुती , काळे , साले , दवंडी , मोहगाव , कोसमी, पकन्नाभट्टी आदी गावातील विद्यार्थिनीं शिक्षणासाठी ये-जा करणे सोयीचे व्हावे.यासाठी मानव विकास योजनेतून सायकलींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे , शिक्षक , हरिश्चंद्र मडावी ,महेश चौधरी ,जीवन भैसारे ,तुळशीराम कराडे , वसंत गुरनुले ,सुरज हेमके श्यामराव उंदीरवाडे , क्रुष्णामाई खुणे ,निर्मला मडावी ,प्रिया कापगाते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन हरिश्चंद्र मडावी तर आभार निर्मला मडावी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी मुन्शीलाल अंबादे , कैलाश अंबादे , सुरेश जमकातन , पराग खरवडे आदी ने सहकार्य केले.