कोरची
कोरची तालुक्यातील ३३ केव्ही महावितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या बेतकाठी फिडर मधील जामणार ते बोरी गावाच्या विद्युत वाहिनीवर बिघाड दुरुस्तीच्या कामाला असणाऱ्या एका कामगार युवकाला वीजेचा धक्का लागल्याने कामगार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान घडली आहे.
मिथुन गिरधारी आंडुलवार (30 रा.बिहटेकला) असे गंभीर जखमी कामगार युवकाचे नाव आहे. जामणारा व बोरी गावात मागील काही वर्षांपासून एबीस कंपनी उभारण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीला नियमित विद्युत पुरवठा केला जाते परंतु सोमवारला याच विद्युत वाहिनीवर बिघाड होते ते दुरुस्ती करण्यासाठी विद्युत विभागातील बिघाड झालेल्या कामांची दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदाराला असते या कंत्राटदार अंतर्गत काम करणाऱ्या मजूरा पैकी हा एक मजूर युवक आहे. गेल्या सहा वर्षापासून कोरची तालुक्यात विद्युत वाहिनी सुरळीत व सुधार करण्याच्या कामावर हा कामगार आहे.
ज्यावेळी जामणारा गावाच्या पुढील रस्त्यावर ११ केव्ही विद्युत वाहिनीवरील एका विद्युत पोलावर चढून काम करतेवेळी अचानक विद्युत धक्का बसला आणि २० फूट पोलवरून हा युवक खाली पडला यामध्ये त्याचा कमरेला जोरदार मार लागले तर डाव्या हाताला जखम झाली यावेळी बेतकाठी फिडर चे लाईनमेन नंदकिशोर अलोने सोबत होते आपल्या अधिकाराखाली या कामगार मजूरांना सोबत घेऊन ते काम करत होते. या फिडरवरील एबी स्विच लॉक न केल्याच्या कारणामुळे हा वीजेचा धक्का मिथुनला बसला असल्याचे बोलले जात आहे.
जखमी मिथुनला तात्काळ घटना स्थळावरून महावितरण चे सहायक अभियंता प्रफुल कुडसंगे यांच्या मदतीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉ आशिष इटनकर वैघकीय अधीक्षक डॉ अभय थुल यांनी प्राथमिक उपचार देऊन प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी रात्री १० वाजता दरम्यान 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने 102 रुग्णवाहिकाने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक गावातील रोहित्र उघड्यावर असल्याचे दिसून येत आहे विद्युत रोहित्र उघड्यावर असल्याने गावशेजारील असलेल्या रोहित्र्यामुळे कुणीही स्विच बंद किंवा सुरू करू शकतो तर याचा त्रास अशा मजुरांच्या जिवावर बेतू शकतो त्यामुळे ज्या लाईन मेन किंवा अभियंता यांच्या अधिकाराखाली सदर मजूर काम करतात त्यांची सर्वस्वी जबाबदारी असते त्यामुळे सदर अपघाताचे जबाबदार कोण असे प्रश्न येथील नागरिकांना पडले आहे. सदर प्रकरणाबाबद कोरची येथील उपकार्यकरी अभियंता सुमित वाढरे यांना फोनवरून संपर्क केले असता त्यांनी फोन घेतला नाही.