मसेली येथील छत्रपती हायस्कूलमध्ये कार्यशाळेचे उद्घाटन

 

 

 

कोरची

बोटेकसा केंद्रा अंतर्गत शाळा पूर्वतयारी चे पहिले पाऊल प्रशिक्षण मसेली येथील छत्रपती हायस्कूल येथे 20 एप्रिल रोजी बोटेकसा जिल्हा परिषद केंद्र शाळा मुख्याध्यापक कोटगले यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्घाटक म्हणून छत्रपती हायस्कूलचे मुख्याध्यापक राऊत, बीहीटेकला मुख्याध्यापक ओ डी टेंभुर्णे, कोटरा मुख्याध्यापक दांडवे, मसेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रशिक्षणाला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व सर्व अंगणवाडी सेविका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पहिल्या तासिकेत सुलभक राजेश परशुरामकर यांनी शाळा पूर्व तयारी मेळावा व त्याची आवश्यकता, मागील सत्रात मेळावा राज्यस्तर याच्या आढावा. गडचिरोली जिल्ह्यातील आढावा अंगणवाडी सेविका व मुख्याध्यापक यांची जबाबदारी व पहिले पाऊल प्रशिक्षण आवश्यकता याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. सातही स्टालवर स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांची भूमिका काय राहील याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या तासिकेत सुलभक पितांबर प्रधान यांनी मेळाव्यातील स्टाल, लीडर माता व स्वयंसेवक तसेच शाळा स्तरावर मेळावा तयारी कशी करायची याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले व दोन गट पाडून त्यांच्याकडून प्रत्यक्ष शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे उत्कृष्ट सादरीकरण करवून घेतले.

या प्रशिक्षणाला तालुक्यातील 41 शिक्षक तर 18 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यशाळेचे प्रास्ताविक परशुरामकर सर यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन कुमारी खेमंतीनी कोवे मॅडम यांनी केले. दुपारी एक वाजता दरम्यान वंदे मातरम गीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.