मसेली येथे शालेय विद्यार्थीनींना सायकल वाटप

 

सावित्रीच्या लेकींच्या प्रवास झाला सुकर !

कोरची दि.२३
कोरची तालुक्यातील मौजा मसेली येथील छत्रपती हायस्कुल तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.२० एप्रिल रोजी राजस्व विभाग कोरची च्या वतिने शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून छत्रपती हायस्कुल तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या तिन विद्यार्थीनींना मानव मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करुन योजनेचा लाभ देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी जि.प.सदस्य अनिल केरामी होते. कार्यक्रमाला तहसिलदार गजभिये कोरची, सरपंच सुनिल सयाम मसेली, उपसरपंच विरेंद्र जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य मुन्नजी उईके, पोलीस पाटील विद्याताई हिडामी, प्रतिष्ठित नागरीक प्रतापसिंह गजभिये, राजाराम नैताम, शालीकराम हलामी, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर.मेश्राम, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक वरखडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.