कोरची:: येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे शाळा पूर्व तयारी मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मा.टेंभुर्णे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरची यांच्या मार्गदर्शनाने शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजन करण्यात आले. प्रत्येक वॉर्डात मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.मनिषा कावळे तर उद्घाटक विठ्ठल गुरनुले होते.प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद टेंभूरकर मुख्याध्यापक, मा.हिराजी रामटेके केंद्र प्रमुख कोरची, पवन राले ,परदेशी बघवा, सुरेश मोहर्ले, गोपाल शेंदरे,वेणू सोनार, पुरुषोत्तम वघारे होते. अंगणवाडी सेविका बसंती अंबादे, लता मडावी, मंदा शेंडे, सगुना कुमरे यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. काही विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य केले.
भरतीपात्र विद्यार्थ्यांना टोपी तसेच पुष्पगुच्छ देऊन पालकांसोबत स्वागत करण्यात आले. विविध खेळ आणि कृती करून घेण्यात आल्या. कृती पुस्तकांचे वाटप करण्यात आले. माता पालक गट तयार करण्यात आले. स्मार्ट मातांची निवड करण्यात आली. शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे संचालन कांता साखरे यांनी केले. आभार प्रदर्शन हेमलता तितीरमारे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोदिनी काटेंगे, मारोती अंबादे, आरती चांदेकर, सोनाली सोरते ,महेश जाळे, अरविंद टेंभूरकर, कांता साखरे, हेमलता तितीरमारे यांनी परिश्रम घेतले.