- कोरची ::येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला. मा.अरविद टेंभूरकर मु.अ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थांना निरोप देण्यात आले आणि पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या . काही विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आंतर जिल्हा स्थानांतरण झालेल्या सोनाली सोरते आणि जिल्हा अंतर्गत स्थानांतरण झालेल्या हेमलता तितीरमारे मॅडम यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानाने निरोप देण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक अरविंद टेंभूरकर, विनोद भजने ,कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, मारोती अंबादे, निळा किन्नाके मुक्तीपथ समन्वयक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती कोरची येथील गटशिक्षणाधिकारी मा.टेंभूर्णे साहेब यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
‘ तंबाखमुक्त शाळा ‘ करण्याकरिता सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांची प्रतिज्ञा घेण्यात आली .हेमलता तितीरमारे यांनी आतापर्यंत आलेले चांगले अनुभव तसेच सर्व स्टापकडून मिळालेले सहकार्य याविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन आरती चांदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश जाळे यांनी केले .विद्यार्थ्यांना बिस्किट आणि चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.