कोरची येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम सकाळी बाजार चौकातील बौद्ध झेंड्या जवळ जाऊन तथागत बोधीसत्व गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून हार अर्पण करण्यात आले त्यानंतर को-ऑपरेटिव्ह बँक कोरची येथील सहा. मॅनेजर सोरदे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते. त्यानंतर धम्मभूमी येथे दीप प्रज्वलित करून ध्वजारोहण रमाई महिला मंडळाचे अधक्ष्या सौ. ज्योतीताई भैसारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहारांमध्ये जाऊन बोधीसत्व गौतम बुद्ध, महामनाव डॉ. भीमराव आंबेडकर तसेच ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला दीपक प्रज्वलित करून हार अर्पण करण्यात आले त्यानंतर रमाई महिला मंडळाचे सचिव सौ. छायाताई साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्वांना यावेळी अल्पोहार देण्यात आले. सायंकाळी कोरची शहरातील सर्व बौद्ध बांधवांचा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या सर्व कार्यक्रमाला सर्व कोरची शहरातील बौद्ध बांधवांनी सहकार्य केले व बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रम शांततेने पार पडला.