कोरची सारख्या अति दुर्गम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत व आनंदोत्सव साजरा

 

 

*कोरची : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या लोक माझे सांगती पुस्तक प्रकाशन सोहोळ्यात केली. त्यानंतर शरद पवार यांनी तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सातत्याने कार्यकर्ते करीत होते. यासाठी राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागणी आणि आंदोलने केली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठिकठिकाणी एकच जल्लोष करीत आहेत व या निर्णयाचा स्वागत करीत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरची तालुक्यात आज राष्ट्रीय मार्गाच्या मुख्य चौकात गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे फटाके फोडून व जिलेबी चे वाटप करून जल्लोषात स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. व समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशका नेता कैसा हो, पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परीसर दणाणला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, रायुकाँ तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, रायुकाँ शहर अध्यक्ष चेतन कराडे, कपिल बागडे, रामनाथ कोरचा, चंद्रशेखर वालदे, विनोद गुरनुले, श्रीराम नैताम, सुनिल कुमरे, लहानू सहारे, निखिल मोहने, प्रशिक सहारे, मानसिंग नुरूटी, रमेश तुलावी, भारत नरोटे, यशवंत सहारे, विजय उइके, प्रकाश कोडापे, सिद्धार्थ जांभुळकर, अंकित नंदेश्वर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.