शेतकरी हिताला प्राधान्य देत समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प – आमदार कृष्णा गजबे

मुंबई:

आज दि. 9 मार्च 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अमृत काळातील महाराष्ट्र राज्याचा सन 2023-24 वर्षाचा महाराष्ट्रातील शेतकरी व सर्व घटकांना न्याय देत राज्याला प्रगती पथावर नेणारा महत्वाकांक्षी पहिला अर्थसंकल्प सादर केला. प्रथम अमृत मध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवुन प्रति तिमाही रु. 2 हजार वर्षाला रु. 6 असे केंद्र व राज्य सरकार मिळुन शेतकऱ्यांना एकुण रु. 12 हजार मिळणार. द्वितीय अमृत मध्ये महीला,आदिवासी, मागासवर्ग ,ओबीसींसह सर्व समाज घटकांचा विविध योजनेतून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना राबवुन सर्व समावेशक विकास करणार.
ज्यामध्ये प्रामुख्याने इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना ‘मोदी आवास’ घरकुल योजनेतुन तिन वर्षात 10 लाख घरे बांधून मिळणार. तृतीय अमृत मध्ये राज्यात भरीव भांडवली गुंतवणूक करुन पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या शृंखलेत जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकाम करण्याची राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आश्वस्त केले आहे. चतुर्ध अमृत मध्ये रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल – रोजगार क्षम युवा तयार करण्यासाठी तांत्रिक व कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर दिला जाणार. पंचम अमृत मध्ये पर्यावरण पुरक विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार अर्थसंकल्प आहे.