पोलीस नाइक नरेश वासेकर यांचे कार्य प्रशंसनीय* पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे प्रतिपादन.

आरमोरी- आरमोरी पोलीस स्टेशनचे कर्तबगार,शांतप्रिय,सुस्वाभी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले पोलीस नायक नरेश वासेकर यांचे कार्य खरच प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी केले. आरमोरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस नायक नरेश वासेकर यांची एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रात बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी आरमोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व सत्कारमूर्तीं म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल सोमनकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक माणिक भोयर होते.तर सत्कारमूर्तीं म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुनघाटे,ट्रॅफिक पोलीस हवालदार रमेश बगमारे व पोलीस नायक नरेश वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे म्हणाले की,पोलीस नाईक नरेश वासेकर हे तीन वर्षाच्या कालावधीत विना तक्रार आणि विनम्र सेवा बजावत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी लॉक डाऊन च्या काळात अविरत प्रयत्न करीत सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे. तालुक्यात घडलेल्या विविध गुन्ह्याच्या तपासात सर्वच पोलिसांचे चांगलेच सहकार्य मिळाले. पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी असतांना त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगले राखण्याचे कार्य केले.
सत्काराला उत्तर देतांना पोलीस नाईक नरेश वासेकर यांनी आपल्या आठवणीना उजाळा देत अनेक किस्से पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आरमोरी येथील पत्रकारांनी व निष्काम सेवा देणाऱ्या होमगार्ड यांनी आपल्याला एक मित्र म्हणून त्यांनी जोडलेली नाळ कायम स्मरणात राहील. आपल्या सेवा काळात काम करतांना सर्वांशी एक निष्ठ राहून व प्रामाणिक सेवा करून पोलीस हाच जनतेचा खरा मित्र आहे ही संकल्पना राबविल्याने प्रामाणिक सेवा करून न्याय देता आला. जनतेकडून पोलिसांबद्दल वाढलेले प्रेम हे आम्ही केलेल्या प्रामाणिक सेवेचे प्रतीक आहे.
यावेळी आरमोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे,नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुनघाटे,ट्रॅफिक पोलिस हवालदार रमेश बगमारे व बदली झालेले पोलीस नाईक नरेश वासेकर यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात हरेंद्र मडावी यांच्या ‘एक हसी शामको – दिल मेरा खो गया’ यांच्या गायनाने झाली. तसेच कार्यक्रमाची सांगता’ कभी अलविदा ना कहना’ या सुमधुर गीताने झाली.त्यामुळे संपूर्ण वातावरण भावुक झाला होता.
कार्यक्रमाचे संचालन पुण्यनगरीचे पत्रकार आकाश चिलबुले, प्रास्ताविक सकाळचे पत्रकार प्रा.प्रशांत झिमटे तर आभार नवभारतचे पत्रकार हरेंद्र मडावी यांनी केले.
सदर कार्यक्रमाला सर्व पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,होमगार्ड बंधू, पोलीस कर्मचारी,एकनाथ ढोरे,बांबोळे,होमगार्ड सुरेश सोनटक्के,मोरेश्वर मेश्राम, प्रमोद गोंधोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार रुपेश गजपुरे, भीमराव ढवळे,दौलत धोटे,अमरदिप मेश्राम, भगवान बन्सोड,महेंद्र रामटेके,सुरेश कांबळे,प्रवीण रहाटे,विलास चिलबुले,रोहिदास बोदेले,सामाजिक कार्यकर्ते राकेश बैस, नितीन मडावी यांनी अथक परिश्रम घेतले.