महात्मा फुले विद्यालय देऊळगाव येथे सावित्रीच्या लेकीना सायकल वाटप

आरमोरी तालुक्यातील आनंद शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय देऊळगाव येथे बाहेर गावावरुन शिक्षणासाठी ये – जा करणाऱ्या सावित्रीच्या लेकीना मानव विकास मिशन अंतर्गत 24 सायकलचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी आनंद शिक्षण संस्था, आरमोरीचे अध्यक्ष मा.प्रा. शशिकांत गेडाम , देऊळगावच्या सरपंचा मा. सौ. श्यामादेवी सहारे , मा.श्री. कवळूजी सहारे ग्रा.पं. सदस्य देऊळगाव , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. शिलाताई डोंगरे , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुरेश चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सायकलमुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करणे सुकर झाल्याचे मत व्यक्त केले.