महात्मा फुले विद्यालय, देऊळगाव येथील तीन विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत सुयश….

  • आरमोरी तालुक्यातील आनंद शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव येथील शैक्षणिक सत्र 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या ‘ राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ‘ ( NMMS ) या परीक्षेत वर्ग 8 वीच्या विद्यार्थिनीं कु. गिता धनपाल लिंगायत , कु. अंशु हरेंद्र मेश्राम , कु. कल्याणी भाऊराव वाघाडे यांनी सुयश संपादन केले. यशवंत विद्यार्थ्यिंनींचे उत्साह व मनोधैर्य वाढविण्यासाठी दि. 11 फेब्रुवारी 2023 ला सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश चौधरी होते. प्रमुख अतिथी मा. शरद मांढळकर , मा. माया पटेल होते. मान्यवरांच्या शुभहस्ते उत्तीर्ण विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करावे व आपला शैक्षणिक जीवन सुकर करावा , ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नाशी तडजोड करु नये असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रा.मा. शशिकांतजी गेडाम , संस्था सचिव मा.श्री. अजयजी गेडाम यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व शिक्षक वृंदानी सुद्धा यशवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मा. ललेश्वर रोहणकर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.