जागतिक महिला दिनी आदर्श शिक्षिका शालिनीताई गेडाम यांचा सत्कार

आरमोरी ..जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून आरमीरी येथील समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श शिक्षिका शालिनीताई गेडाम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

दरवर्षी ८ मार्च हा रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.
मार्च १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर १९१० मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. यानंतर दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

जागतिक महिला दिनानिमित्त आरमोरी येथील जेष्ठ समाजसेविका तथा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ. शालिनीताई गेडाम यांच्या निवासस्थानी जाऊन समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा.शशिकांत गेडाम, सौ.संगीता शशीकांत गेडाम सौ.दिक्षा अजय गेडाम,समता युवा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक प्रा. अमरदीप मेश्राम , महेंद्र रामटेके, ॲड. अमित टेभूर्णे, अध्यक्ष निलेश अंबादे, सचिव अनुप रामटेके,सहसचिव मंगेश पाटील ,रुपेश जौंजलकर, सौरभ मस्के, हर्षल खोब्रागडे, आदित्य सोनटक्के, व समता युवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

*आरमोरी* …जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून आरमीरी येथील समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श शिक्षिका शालिनीताई गेडाम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.