आरमोरी… शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या. शिवगर्जना यात्रेत विदर्भातील तीन जिल्हयात माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी हे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे खा. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत बुलठाना, अकोला अमरावती या जिल्ह्यातील शिवसैनिकाशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक २५ फेब्रुवारी ते ३मार्च च्या दरम्यान शिवगर्जना यात्रा विदर्भातील तिन जिल्हयात काढण्यात येणाऱ आहे या यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्षपने संवाद साधून शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येणार आहे.
आरमोरी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांची पक्षाने निवड केली असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खा. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्हयात फिरून शिवसैनिकांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेनेत राजकिय भूकंप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून शिवसेनेला एकावर एक धक्के बसत आहेत . त्यामूळे सर्वसामान्य शिवसैनिक, कार्यकर्ता, पदाधिकारी हा आपल्या बाजूने उभा रहावा व त्यांच्यात निर्माण झालेला संभ्रम दुर करुन पक्षाची नव्याने बांधणी करून सर्वसामान्य सेनेच्या कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सूरु आहेत्. त्यामुळें संपुर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्हयात बैठका, मेळाव्याचे सत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात शिवगर्जना रॅली काढणयात येणार आहे. या रॅलीत माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी हे सहभागी होणारं आहेत.