उन्हाळी शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक तीनशे शेतकऱ्यांची इटियाडोह व तहसिल कार्यालयावर

  • आरमोरी- तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात शेकडो हेक्टरवर धान पिकाची लागवड केली आहे. तालुक्यात एकमेव जलस्ञोत म्हणून इटियाडोह धरणावर शेतकरी अंवलबून आहेत.पंरतु पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धान पिके संकटात सापडले आहे.त्यामुळे

तालुक्यातील. शेतकऱ्यांनी इटीयाडोह धरणाचे पाणी सोडण्यात यावे या मागणीसठी शेतकऱ्यांनी आरमोरी तेथील इटीयाडोह प्रकल्प कार्यालय व तहसील कार्यालयावर धडक दिली.

अंतरजी,अरसोडा,कासवी,आष्टा,रवी मुल्लुच चक येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान व इतर पिकाची लागवड केली आहे.गडचिरोली जिल्हासाठी इटीयाडोह धरणाच्या ४०% पाण्याचा कोटा असताना सुद्धा टेल वरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांचे पऱ्हे व रोवणी पिकाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेतकरी वारंवार पाण्यासाठी झटत असताना अधिकारी तांत्रिक बाबी सांगून वेळकाढू धोरण काढत आहेत. आणि शेतकऱ्यांचे उभे धानपिके तणीस होण्याच्या मार्गावर आहेत.वडसा येथील इटीयाडोह कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मेंढे हे नेहमी शेतकऱ्यांना पाणी न मिळण्याला जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

आरमोरी तालुक्यात ४५ ते ५० क्युसेस पाण्याची गरज असताना फक्त १० ते १२ क्युसेस पाणी दिले जात आहे. ही तर शेतकऱ्यांची बोळवण सुरू आहे. वास्तविक पाहता इटीयाडोह धरणाचे पाणी लागु असलेल्या आरमोरी तालुक्यांतील शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथमतः प्राधान्य द्यायला पाहिजे होते परंतू तसे होत नसल्याने धानपिके करपयला लागली आहेत.त्यामुळे संतापलेल्या तीनशेच्या वर शेतकऱ्यांनी आरमोरी येथील इटियाडोह कार्यालयांवर धडक दिली परंतू तिथे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यानी आपला मोर्चा तहसिल कार्यालयाकडे वळविला. यावेळी नायब तहसीलदार दोनाडकर यानी इटीयाडोह पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पराते व कार्यकारी अभियंता राजीव कुरेवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन चर्चा करून आरमोरी तालुक्यात पाण्याची गेंज वाढविण्याची मागणी केली.

. आमचे पिके करपायला लागली…अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी करावी आणि जर आमच्या पिकाला पाणी मिळाले नाही तर इटीयाडोह प्रकल्पाने पिकाची नुकसान भरपाई द्यावी. आणि नेहमीच आरमोरी तालुक्यांतील शेतकऱ्यांशी दूजाभाव करणाऱ्या इटीयाडोह प्रकल्प कार्यालय वडसाचे उपकार्यकारी अभियंता मेंढे याना निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यानी दिला आहे.
यावेळी कासवीचे माजी उपसरपंच प्रविण रहाटे, निळकंठ सेलोकर मनोहर गोन्नाडे, सिताराम गुरनुले, शिवदास चौके, गोपाल पगाडे, खुशाल गुरनुले, एकनाथ धकाते, अजय वाटगुरे, कांजीलाल वझाडे, अशोक भोयर, ज्ञानदेव ठवरे, आदी बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.