आरमोरी शहरात नियमित पाणीपुरवठा करा….* शहरात नियमित पाणीपुरवठा न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांचा इशारा

आरमोरी नगरपालिकेला तब्बल चार वर्षे झाली आणि पुन्हा सभापती निवडणुका पार पडल्या, बहुमत असल्याने सभापती म्हणून भाजपचे सर्व मंडळ स्थापन झाला, आणि पुन्हा त्याच लोकांना त्यांची जुनी खाती मिळाली गेल्या चार वर्षापासून सुरू असणारा नगरपालिकेचा ससे मिरा पुन्हा त्याच खांद्यावर ठेवला गेला, पुढील वाटचालीच्या अनेक स्नेही लोकांनी शुभेच्छा दिल्या परंतु तेच सभापती आणि तीच पदे मिळाल्याने जनतेच्या कामाला आणि नगरपालिकेच्या गतीला याचा फायदा होणार नाही असे सूरही उठू लागले. इकडे सभापती निवडणूक पार पडली स्वागतांचा कार्यक्रम पार पडला आणि तिकडे दुसऱ्या दिवसापासून आरमोरी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाली गेल्या चार-पाच दिवसापासून नळाला पिण्याचे पाणीच नाही शहरातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करायला लागली आणि जनतेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला, की पूर्णपणे एक हाती सत्ता आली की एका वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणून आणि प्रत्येकाच्या घरी नळ देऊ आणि नळाला जल देउ अशे आस्वासन दिल्या गेले. परंतु जनतेनी मतदान करून निवडणूक जिंकवली सत्तेत बसविले आहे परंतु अद्यापही चार वर्षे पूर्ण झाले आणि शहरातील जनता त्या नवीन नळ योजनेची आता चातक पक्षासारखी वाट पाहू लागली आहे परंतु अजूनही त्याचा काही पत्ताच लागत नाही केंद्रात आणि राज्यात तसेच नगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता असून सुद्धा पाण्याचा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही म्हणून सत्तेवर असलेली भाजपची सरकार अपयशी ठरलेली आहे. राज्यातील भाजपची सत्ता असून या जिल्ह्याचे पालकमंत्री या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री सुद्धा त्यांच्याकडेच आहेत परंतु ते जिल्ह्याकडे कधी फिरकत नाही आमदार खासदार पळवा पळवी चे राजकारण करून फक्त सत्ता काबीज करण्यात व्यस्त आहेत निवडणुकीला चार वर्षे लोटली आणि अवघा एक वर्ष निवडणुकीला बाकी असल्याने आता मात्र प्रश्न पडला आहे की कसाही करून या सत्रात नवीन पाणीपुरवठा मंजूर करून आणावीच लागेल आणि किमान भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात करावा लागेल. अन्यथा पुढील निवडणुकीत जनतेसमोर जाताना काय उत्तर देणार ,याची धडपड मात्र आता सुरू झाली आहे नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यावर ही किमान त्याची पूर्तता आणि प्रत्येकाच्या घरात नळाचे पाणी यायला एक दोन वर्षाचा कालावधी किंवा त्याहीपेक्षा जास्त विलंब लागू शकते.
उन्हाळा लागण्यापूर्वीच आता ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे असाच राहिला तर मात्र सुरू होणारा उन्हाळा आरमोरी शहरातील जनतेला पाण्यासाठी कठीणाईचा होऊ शकते गावात पाणीपुरवठा बंद असताना आणि मोठ्या प्रमाणात कर वाढ झाल्याने निराश झालेल्या जनतेला सूचना देण्यासाठी घंटागाड्यांच्या माध्यमातून कर भरण्यासाठी मुनादी दिला जात आहे. आणि घरोघरी जाऊन वसुली ही केल्या जात आहे. त्यामुळे जनता निराश झालेली आहे शहरातील लोकांना पावसाळा वगळता नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो महिन्यातून केवळ आठ ते दहा किंवा त्यापेक्षा कमी दिवस पाणीपुरवठा होतो शहरात मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अतिदुर्गम भागात नसेल त्याहूनही अधिक बिकट पाणीटंचाईची समस्या आरमोरी शहरात आहे. शहरातील पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने अनेक भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.आणि म्हणून एकंदरीत अशा नगरपालिकेच्या कारभारामुळे आणि सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीत जनता नक्कीच धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.
शहरात नियमित पाणीपुरवठा न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केला आहे.