जीवनज्योती महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न 

 

कोरची

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कोरची अंतर्गत जीवनज्योती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाग संघ कार्यालय बेडगाव येथे घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघाचे अध्यक्ष शकुंता नैताम, तर उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत बेडगाव येथील सरपंच चेतानंद कीरसान, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत कोचीनारा येथील सरपंच सुनिता मडावी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक कदम, ग्रामपंचायत बेडगावचे सचिव दयानंद दूधे, तालुका अभियान व्यवस्थापक सिद्धेश्वर बेले, तालुका व्यवस्थापक प्रमोद धूर्वे, प्रभाग समन्वयक विनोद गडपायले, जस्विंदर सहारे, अनिता फुलकवर, सुरेखा नरोटे तर सत्कारमूर्ती म्हणून मानकुबाई कराडे आदी उपस्थित होते.

मागील वीस वर्षापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावणाऱ्या आणि उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात हीरहिरीने भाग घेणाऱ्या रमाबाई महिला बचत गटाच्या सदस्य मानकुबाई कराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटक स्थानावरून बोलताना सरपंच चेतानंद कीरसान यांनी महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या उमेद अभियानाची प्रशंशा केली या अभियानामुळे महिलांना बचतीची सवय लागली असून सावकारी पाशातून लोक मुक्त होत आहेत आज बऱ्याच ठिकाणी महिला स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे आहेत शासनातर्फे या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येत आहेत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून असलेले शाखा व्यवस्थापक कदम यांनी बँकेतर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम योजना शासनातर्फे काढण्यात येणारे विमा आणि त्याचे लाभ याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. आपल्या सत्कार प्रसंगी उत्तर देताना मानकुबाई कराडे म्हणाल्या महिलांनी बचतीची सवय लावून आपला संसार करावा आणि अनावश्यक खर्च टाळावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनोद गडपायले यांनी केले. तर संचालन रत्नमाला सहारे आभार दिपाली शेंडे यांनी मानले. याप्रसंगी बेडगाव-कोटगुल परिसरातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता अंजना बोगा, केवरा सोनफुल, ज्योत्स्ना पारट्वार, उज्वला शेंडे, जास्विनी

जनबंधू , रोशनी रामटेके, प्रणाली टेंभुर्ण व सुधाकर हिडामी आदींनी सहकार्य केले.