जरा सांभाळून त्या पुलावरून, नाहीतर पुलावरील खड्ड्याच्या अपघातात पडून जाल वाहून….

 

कोरची

कोरची मुख्यालयापासून दीड किलोमीटर अंतर येत असलेल्या कोरची ते कोचीणारा रोडवरील स्मशानभूमी जवळच्या पुलावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांनी व वाहनचालकांनी जरा सांभाळून पुलावरून वाहन चालवण्याची गरज आहे अन्यथा खड्ड्यात वाहन जाऊन अपघात झाले तर नाल्यात वाहून जीव जाण्याची दाट शक्यता आहे.

या मार्गावरून कोचीनारा, जोडातराई, दवंडी, कुकडेल, पांढरापाणी, सातपुती, बेलगाव (घाट), जामणारा, बोरी, चिलमटोला, राजाटोला, टेमली, आंबेखारी अशा गावांना जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गावरील कोचीणारा पुलावरून शेकडो वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ या पुलावर पडलेला खड्डा बुझविनाची व डागडुजगी करण्याची परिसरातील प्रवासी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

खड्डा बुजवण्यासाठी उशीर झाल्यास एखादी वेळेस नवीन वाहनचालक जड वाहन त्या पुलावरील खड्ड्यातुन नेले तर पूल खसून मोठे अपघात होऊ शकते. तसेच त्या पुलावर कठडेही नाही अपघात होऊन डायरेक्ट पुलाखाली पाण्यात वाहन व वाहनचालक जाण्याची भीती आहे. अनेक वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम झाले होते हे पुल खूप जुने असल्यामुळे आता या ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाले आहे त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.