वनश्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथे शिक्षक दिन साजरा

 

 

कोरची

          स्थानिक वनश्री कला व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय कोरची येथ आज दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून सजरा करण्यत आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जी. टी. देशमुख होते तर प्रमुख अतिथि म्हणून प्रा. महेश्वर बंसोडे, प्रा. संतराम धिकोडी, प्रा किशोर वालदे, प्रा. जितेंद्र विनायक, प्रा. कु. जुली बाराहाते, प्रा. नीलकंठ फूंडे आदी उपस्थित होते. 

    या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कु. सरोजिनी सोनकुकरा, कु. त्रिशा सहारे यानी मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथि म्हणून प्रा. महेश्वर बंसोडे यानी शिक्षक कसा आदर्श असावा या विषयी मार्गदर्शन केले तर अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्रा देशमुख यानी एक शिक्षक किती उंच भरारी मारू शकतो हे डॉ राधाकृष्णन यांच्या जीवन पटावरुन विद्यार्थिना संबोधित केले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मीनाक्षी मेश्राम तर आभार कु. माधवीताई राउत यानी केली कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते