कोरची
कोरची तालुका मुख्यालयापासून सहा कि.मी. अंतरावर दुपारी २:३० वाजता सोहले गावाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारच जागीच मृत्यू झाला आहे. महेश रामसाय कोवाची वय २३ वर्ष रा. शिकारिटोला ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे.
छत्तीसगड राज्यातून भरधाव वेगाने निघालेला ट्रक क्रमांक CG 13 AF 6527 यांनी सोहले गावाजवळ विरुद्ध दिशेने दुचाकी क्रमांक CG 08 AF 5878 महेश कोवाची कोरचीवरून कंप्युटर क्लास आटपून स्वतः च्या गावी शिकारिटोला येथे परत जात होता दरम्यान अनियंत्रित ट्रकनी जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकी स्वार महेश फुटबाल सारख दूरच्या शेतात जाऊन पडला व त्याच जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मोटारसायकल ही चेंदामेंदा झाली असून ट्रक रस्त्याच्या एका कडेला खाली जाऊन घुसली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असून ट्रक रोडभर चालवीत होता सदर ट्रक सुरजागड लोहखनिजची असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी कोरची पोलीस दाखल झाले असून अपघातातील दोन्ही वाहनांना कोरची पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृतक महेश कोवाची याला खाजगी वाहनाने कोरची ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी नेण्यात आले असून या घटनेचा संपूर्ण तपास कोरची पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करीत आहे.