राजमातेश्वरी राजमाता कंकालकारो देवीच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

पारंपरिक पद्धतीने करण्यात आली पूजा अर्चना, हजारो भाविकांची उपस्थिती

 

कोरची :

तालुक्यातील समस्त जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या कुमकोट येथील 60 गावची देवी राजमाता राजेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा व नवीन मंदिराचे उद्घाटन कार्यक्रम कुमकोट येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे तर अध्यक्ष कुमकोट येथील राजवैद्य राजीमसाय कल्लो होते. प्रमुख अतिथी म्हणून नसरुद्दीन भामानी भाजपा तालुका अध्यक्ष, मनोज अग्रवाल काँग्रेस तालुका अध्यक्ष, सियाराम हलामी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, रामसुराम काटेंगे अध्यक्ष गोंड समाज कोरची, प्राचार्य देवराव गजभिये, आनंद चौबे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, घनश्याम अग्रवाल नगरसेवक, गोविंद दरवडे, प्रशांत गड्डम तहसीलदार, राजेश फाये संवर्ग विकास अधिकारी, सौ. अनिता नुरुटी सरपंच ग्रामपंचायत सातपुती, सौ. दामिनी शेंडे, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, जितेंद्र सहारे, नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, आसाराम शेंडे आधी उपस्थित होते.

कुमकोट येथील देवस्थान संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान असून याचे जिर्णोद्धार व्हावे याकरिता कार्यकर्ते नेहमी आग्रही असायचे. याकरिता मी सुद्धा सतत पाठपुरावा करून कुमकोट येथील मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले व कुमकोट येथे भविष्यातही विकासात्मक कामे अशाच प्रकारे आणून मंदिर परिसराचा जिर्णोद्धार करू तसेच आज या देवस्थानचे उद्घाटन माझे हस्ते झाले मी याला आपले भाग्यच समजतो असे उद्गार यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या उद्घाटननीय भाषणात केले. यावेळी आयोजकांतर्फे आमदार कृष्ण गजबे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आले.

सदर कार्यक्रमांमध्ये आलेल्या गाव पुजार्यांचे आमदार कृष्ण गजबे यांनी दुपट्टा घालून सत्कार सुद्धा केले. तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या भाविकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा यावेळी करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सदाराम नुरुटी, सिताराम होळी, राजेश होळी, फत्तेसाय होळी, सुरेश काटेंगे, मंसाराम बोगा, लोकेश कल्लो, सुरेश होळी, संदीप होळी, वादुराम नुरुटी, सामसाय होळी, दामेसाय गोटा आदींनी अथक परिश्रम घेतले.