या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची वडसा उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयावर धडक देऊन उपवनसंरक्षक चालविठ्ठल यांना निवेदन
आरमोरी- तालुक्यातील मौजा पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जीगीसाखरा या गावामध्ये मागील 6 महिन्यापासून हत्तींच्या कळपाने हैदोस मांडलेला आहे. यामध्ये काही लोकांची जिवीत हानी, काही लोकांची घरांची नुकसान व ब-याचस्या शेतक-यांचे मका कारली धान टमाटर ईतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे व आपल्या विभागाकडून फक्त हत्तीचा लोकेशन सांगितल्या जाते परंतु त्यांच्यावर नियंत्रण केल्या जात नाहीं त्यामुळे शेतक-यांना व गावकरी यांना आपला जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. आता अवघ्या 15 दिवसात मोह फूल वेचणे व तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु होणार आहे अश्या परिस्थितीत जर एखाद्याच्या जीवाला धोका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील. श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर कुंपण योजने अंतर्गत शेतकन्यांकडून सातबारा वेळोवेळी मागूनही लाभ मिळालेला नाही, हत्तीच्या हैदोसामुळे शाळकरी मुलांना सुद्धा धास्ती भरली आहे. वन विभागाकडून शेतपिकांचे पंचनामे करतांना काटकसर केली जाते व विलंब केल्या जाते त्यामुळे नुकासानीनुसार लाभ मिळत नाही नसल्यामुळे गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयावर धडक देऊन हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करुण आणि हत्तीने नुकसान केलेल्या पिकाचे शेतक-यांना तात्काळ भरपाई देण्यात यावे
या सर्व बाबींचा अति तात्काळ कार्यवाही न झाल्यास 8 दिवसात आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक चालविठ्ठल यांना दिले असता यावेळी उपवनसंरक्षक चालविठ्ठल यांनी सांगितले की आठ दिवसांत हत्ती परीसरातुन बाहेर काडुन शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी मोतीराम लिंगायत गोपाल दोनाडकर आनंदराव राऊत मोरेश्वर मेत्राम शेखर बगमारे हरीचद ठाकरे उत्तम माझी देवाशिष मडल रेवनाथ प्रधान सुरज दिघोरे सिताराम प्रधान नथुजी ढोगे दिपक सरदार सुभाष घुटके हरीदास आबोने प्रफुल्ल मेत्राम पुरषोत्तम मेत्राम शालिक मेत्राम हाजु मंडल मनोज चहादे अजय मेत्राम गौतम बनकर सिध्दार्थ घुटके रोहीत मिस्त्री तारापद मिस्त्री भोला मंडल पुरषोत्तम मैद मंगल प्रधान सुरज दिघोरे शेखर बगमारे दुर्गादास बगमारे अशोक राऊत हरीदास मंडल कंगाल बैरागी शंकर मिस्त्री उत्तम दिलदार भोला माझी यांसह शेकडो शेतकरी महिला उपस्थित होते.
यापुवीही 15 सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शंकर नगर येथील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी जंगली हत्तींचे कळप हाकलून लावण्यासाठी जात असताना शंकर नगर येथील एक शेतकरी विश्वजीत परीमल मंडल वय 36 धावत असताना झाडाला आदळल्याने दुखापत झाल्याने वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व वनपरिक्षेत्र एसडिसिम देसाईगंज विभाचे अधिकारी यांनी साहानुभुती दाखवून दुखापत झालेल्या शेतकऱ्याला स्वतः उचलून आपल्या वनविभागाच्या गाडीने आणून त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात केले ही घटना जात असताना अजुन जगली हत्ती शंकर नगर वरुण पाथरगोटा जगलात शेतीची रात्रो नुकसान करुन 16 सप्टेंबर ला दुपारी दोन ते तिनच्या दरम्यान पळसगाव डोंगरगाव मध्येमद डांबरी करण रस्त्यालगत बदारेवर बसले होते परंतु चार वाजताच्या सुमारास रस्तेवर अचानक येऊन नागरीकांवर धावले असता सहाय्यक वनसरक्षक यांच्या गाडीचे वाहन चालक रस्तेवरच हत्ती पाहताना सुधाकर बाबुराव आत्राम वय ४५ यांच्या वर जगली गाढरा रगाच्या हत्यानी धाऊन हला करुन ठार केले हि घटना जात असताना अजून रानटी हत्तीने आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला ठार केल्याची घटना 29 डिसेंबर ला घडली यात कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर (वय 67 ) असे मृतक महिलेचे नाव आहे.