श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा 

 

महिलांनी नवनवीन सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्यावा – मा. श्री. सुधाकरजी साळवे, संचालक श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरी 

आरमोरी,

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ०८ मार्च हा रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवशी विविध क्षेत्रातील महिलांचा योगदानाची आठवण केली जाते. महिलांच्या सामाजीक,राजकीय, शैक्षणीक,आरोग्य,सास्कृतीक,सामाजीक न्याय, यासह विवीध समस्यांवर लक्ष केंद्रीत करुन समाज जागृती करणे हा मुख्य उद्देश महिला दिन साजरा करण्या मागचा आहे. आत्मसन्मान, संयम, सहन शक्ती निसर्गताचं स्रीला प्राप्त झालेली आहे. महिलांनी आज सर्व क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेले आहे. महिलांमुळे देशाला आज नवी दिशा मिळाली आहे. महिलांसाठी नवनवीन योजना आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा आणि सामोरे जावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक तथा श्री साई इंन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग एंड मेडीकल सायन्सचे अध्यक्ष, वाकडी येथील श्री सुधाकरजी साळवे यांनी केले. ते स्थानिक श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरी येथील ‘जागतिक महिला दिन’ कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशभाऊ ताकसांडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जिल्हा गडचिरोली, अध्यक्ष श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक तथा श्री साई इंन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग एंड मेडीकल सायन्सचे अध्यक्ष श्री. सुधाकरजी साळवे, प्रमुख पाहुणे सामाजीक कार्यकर्ते चंदुजी वडपल्लीवार, उपजिल्हा रुग्णालय आरमोरीचे डॉ. छाया उईके, डॉ.सोनाली धात्रक, आरोग्य सेविका मायाताई पारधी, सामाजिक कार्यकर्ते संजय कापकर, श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग आरमोरी च्या प्राचार्या कु. पूनम नारनवरे, प्रशासकीय अधिकारी भुषण ठकार, कर्मचारी वृंद, विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला, दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली.

याप्रसंगी उद्घाटक श्री. प्रकाशभाऊ ताकसांडे यांनी “स्त्री ची शक्ती आहे अपार, स्री आहे सृष्टीचा आधार,करा स्त्रीचा नेहमीचं सन्मान,तीचं आहे प्रत्येकाच्या जीवनाचा सार’ असे मत जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे भारतीय संविधानाने देशातील महिलांना दिलेले अधिकार, आरक्षण व संरक्षण तथा ८ मार्च जागतिक महिला दिनी विधिमंडळात पारीत झालेल्या चौथे महिला धोरण महिलांना सन्मान व शक्ती प्रदान करणारे ठरेल. महिला विधेयक महिलाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करुन आत्मसन्मान व आत्मविश्वासाने आत्मनिर्भर होऊन स्वत:चा, कुटुंबाचा, गावाचा व पर्यायाने देशाच्या सर्वांगिण विकासात योगदान द्यावे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले,संत,महापुरुषांचा आदर्श व समतेचे विचार आत्मसात करुन मार्गक्रमण करावे असे आवाहन केले.

सामाजीक कार्यकर्त्या डॉ. सोनाली धात्रक यांनी महिलांना समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, शिक्षण किंवा मतदान अशा सर्व क्षेत्रात समान हक्क मिळाले आहेत त्याचा महिलांनी लाभ घ्यावे तथा महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्री च्या आरोग्या विषयी उपयुक्त व महत्वपुर्ण माहीती दिली.उपजिल्हा रुग्णालय आरमोरीच्या डॉ. छाया उईके यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपण सर्व महिला शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात प्रगती करु शकलो. महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासंबधी आरोग्य सेवेचा व आरोग्याच्या विवीध योजनांचा लाभ घ्यावे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरीती दुर सारुन कुपोषण व स्री भृणहत्या टाळण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे.सामाजिक कार्यकर्ते चंदुजी वडपल्लीवार यांनी डॉ. आंबेडकर यांचे ब्रीदवाक्य शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असे सांगून विद्यार्थिनींनी खचून न जाता यशस्वी होण्याकरिता कठोर परिश्रम करावे व मिळालेल्या संधीचे सोने करावे प्रतिपादन केले. आरोग्सौय सेविका मायाताई पारधी यांनी विद्यार्थिनींना आई वडिलांनी शिक्षणाची खूप मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचा दुरुपयोग करू नये असा सल्ला दिला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुधाकरजी साळवे यांनी करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यांनी जगात अनेक देशात महिला संघटना स्थापन होऊन संघटीतपणे हक्क मागण्याची परंपरा सुरू झाली. आज जागतिक स्तरावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी मिळवून स्वतःची क्षमता सिद्ध केली असली तरी या दिनानिमित्त महिलांना आपल्या न्याय्य हक्क मागणीची प्रेरणा मिळते असे संबोधून कार्यक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन केले व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षाचा निकाल लागला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर पोस्टर प्रदर्शनी, रांगोळीचे देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कु. पल्लवी कोथळकर यांनी केले. संचालन कु. योगिता बगमारे व अनामिका तूळसे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रा. कु. पल्लवी कोथळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या कु. पूनम नारनवरे, संगम मेश्राम, पल्लवी कोथळकर, चंदू दुमाने, करिष्मा हांडे, भाग्यश्री मेश्राम, भूषण ठकार, सचिन काळबांधे, अलका मारबते, स्नेहा बोरकर, शालिनी भोयर, वासुदेव फुलबांधे यांनी परिश्रम घेतले.