आरमोरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान..

 

 

पोरेड्डीवार परिवाराच्या सत्काराने पदाधिकारीही भारावले

 

*आरमोरी….. येथील नगरपरिषदेत गेली पाच वर्ष विकास कामे करूण उत्कृष्ट कार्यकाळ सांभाळणाऱ्या आरमोरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व नगरसेवकांचा सत्कार सहकार नेते, तथा गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन शनिवारी करण्यात आला. पोरेड्डीवार परिवाराने केलेल्या सत्काराने पदाधिकारीही भारावले.

 

आरमोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आरमोरी शाखेच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमांत गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते नगर परिषदेचे प्रथम माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, माजी पाणीपूरवठा सभापती विलास पारधी, माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, माजी बांधकाम सभापती सागर मने, माजी महीला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, माजी नगरसेवक मिथुन मडावी, नगरसेविका गिता सेलोकार, सुनिता मने, प्रगती नारनवरे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

 

सत्काराला उत्तर देताना आरमोरीचे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे म्हणाले की, पोरेड्डीवार परिवारामुळे मी वर आलो, त्यांनी माझ्या सारख्या एका सामान्य कुटूंबातील शेतकऱ्याच्या मुलाला आरमोरी शहराचा प्रथम नगराध्यक्ष सारख्या मोठया पदावर बसवल. हे मी माझे भाग्य समजतो.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी शहराचा विकासासाठी प्रमाणिक प्रयत्न केला पोरेड्डीवार परिवारासोबत माझ्या आजोबा पासून असलेले ऋणानुबंधाचा वारसा शेवटपर्यंत जपणार असल्याने त्यानी म्हटले .

 

कार्यक्रमाला सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ. कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक खिळसागर नाकाडे, बँकेचे संचालक अनंत साळवे, आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे व विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.