पळसगाव अरतोडी महादेव पहाडीवर महाशिवरात्री यात्रेच्या निमित्त भागवत सप्ताह सुरु

 

 

जोगीसाखरा आरमोरी तालुक्यातील पळसगाव अरतोडी महादेव पहाडीवर महादेव गड देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री यात्रेच्या निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रे निमित्त भागवत प्रवक्त्या कथा व्यास ह.भ.प. सौ.सुरेखाताई तिखे यांचे भागवत सप्ताह काल दि १० पासून रात्रो ८ ते १० वाजेपर्यंत होऊन दिनांक १६ मार्चला श्रीमद् भागवत समारोप, गोपाल काला होणार आहे रात्रो रोजच मोठ्या प्रमाणात अरततोंडी, डोंगरगाव (हलबी), किन्हाळा, मोहटोला, उसेगाव, फरी, झरी, कासवी, चिखली, विहीरगांव, पोटगाव, शंकरपुर, पाथरगोटा, जोगिसाखरा, शंकरनगर, कोकडी, शिवराजपुर, पिंपळगाव (हलबी), कुरुड, कोंढाळा, रामपुर, आष्टा, अंतरजी देसाईगंज तालुक्यातील भाविक भागवत सप्ताह कार्यक्रमात सहभागी होत आहेत

या ठिकाणी शिव भक्तांची गौरसोय होऊ नये यासाठी देवस्थान कमिटीच्या वतीने सोई सुविधा

उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हि यात्रा उत्सव चांगले व्हावे म्हणुन महादेव पहाडी सार्वजनिक देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे , सचिव गणेश मातेरे सहसचिव रमेश वाढई रामक्रिष्ण ढोरे रामजी मानकर हिरालाल कानतोडे कवडुजी मातेरे नरहरी पिलारे रेवनाथ चवारे दुर्वास नाईक तुळशीदास बाडे अशोक भोयर देवराव उरकुडे पुराणिक गायकवाड यासह पदाधिकारी यांनी अधिक प्रयत्न करीत आहेत.