सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलन इशाऱ्याची दखल
नगर प्रशासनाची युद्धस्तरावर कारवाई सुरु
देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा
देसाईगंज-
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे देसाईगंज- लाखांदुर टी-पाईंट लगतच्या भुमिगत पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचुन असल्याचे आवागमनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यामुळे शहरवाशियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता भुमिगत पुलाखालील साचलेल्या पाण्याचा यथाशिघ्र निचरा करण्यात यावा,अन्यथा घटनास्थळी बेशरमाची झाडे लावुन नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी देताच अखेर भुमिगत पुलाखाली साचलेल्या पाणी काढण्यासाठी नगर प्रशासनाने युद्धस्तरावर कारवाई सुरु केली असल्याने शहरवाशियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
देसाईगंज शहर हे येथील रेल्वे स्टेशनमुळे दोन विभागात विभागले गेले असुन एका बाजूला वसाहत तर दुसऱ्या बाजुला दवाखाने,शाळा, काॅलेज,शासकीय कार्यालये, पोलिस स्टेशन असल्याने नागरिकांना पर्यायी मार्ग असलेल्या भुमिगत पुलाखालुन आवागमन करण्यावाचुन पर्याय नाही. विद्यार्थ्यांना शाळा,काॅलेजात हा मार्ग सोयीचा होत असला तरी पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे आवागमन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
दरम्यान पावसाच्या दिवसात भुमिगत पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचुन राहात असल्याने अलिकडे सेंसारयुक्त गाड्या असल्याने जराही काही तांञीक अडचण आल्यास गाड्या बंद पडुन ट्रफिक जाम होऊ लागली होती.ऐन पाण्यातुन मार्गक्रमण करीत असताना गाड्या बंद पडत असल्याने संपुर्ण वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करू लागली होती.वाहनातील सेंसार खराब होऊन वाहनधारकांना प्रचंड आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागले तर पादचाऱ्यांना आवागमन करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली समस्या मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने थातुरमातुर पाणी निचऱ्यासाठी प्रयत्न केल्या गेला माञ पाणी काढण्यासाठी लावण्यात आलेल्या मशिन्स हटविण्यात आल्याने स्थिती पुर्ववत होऊन पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आवागमनासह वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.ही समस्या यथाशिघ्र सोडवण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना नगर प्रशासन मुग गिळुन गप्प असल्याचे दिसून येऊ लागल्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते पिंकु बावणे, जस्सीसिंग बावरी,शुभम तोडकर,अनिल अवचट, आशितोष मोटघरे,जुनैद बनकर यांनी पुलाखाली बेशरमाची झाडे लावुन जाहिर निषेध करण्यासोबतच नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत युद्धस्तरावर पुलाखाली साचलेला पाणी काढण्याची कारवाई सुरु करण्यात आली असुन भविष्यात परत समस्या उद्भवणार नाही,याही दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.तुर्तास पाणी काढुन मार्ग मोकळा करण्यात आल्याने शहरवाशियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.