प्रेस क्लब अध्यक्षपदावर प्रकाश दुबे यांची वर्णी उपाध्यक्षपदी विलास ढोरे तर सचिव राजरतन मेश्राम रिपीट

 

*देसाईगंज

गेल्या तीन महिण्यापासुन रिक्त असलेल्या प्रेस क्लब अध्यक्षपदावर तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रभातकुमार दुबे यांचे चिरंजीव प्रकाश दुबे यांची वर्णी लावून प्रेस क्लब देसाईगंजने स्व. प्रभातकुमार दुबे यांना श्रद्धांजली वाहली.
दि. ३ फेब्रुवारी २०२३ ला प्रेस क्लब चे तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रभातकुमार दुबे (अर्धसाप्ताहिक त्रिकालनेत्र चे संस्थापक) यांचे निधन झाले. तेव्हापासून प्रेस क्लब अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे रिक्त पद भरण्याकरीता दि. ६ मे २०२३ ला स्थानिक विश्राम गृह येथे जेष्ठ पत्रकार शामराव बारई यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. दयाराम फटींग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेस क्लब देसाईगंजची सभा घेण्यात आली. सर्वप्रथम प्रेस क्लब चे तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रभातकुमार दुबे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहून नविन प्रेस क्लब अध्यक्षांची निवड करण्यात आली. दरम्यान सर्वानुमते सर्व प्रेस क्लब सदस्यांनी स्व. प्रभातकुमार दुबे यांना खरी श्रद्धांजली म्हणून त्यांचे चिरंजीव प्रकाश दुबे यांची प्रेस क्लब अध्यक्ष पदावर निवड केली. तर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व कोषाध्यक्ष पद जसेच्या तसेच ठेवत उपाध्यक्षपदावर दै. सकाळचे विलास ढोरे, सचिवपदावर दै. तरूणभारत चे राजरतन मेश्राम, सहसचिवपदी दै. युवाराष्ट्रचे शहजाद पठाण तर कोषाध्यक्ष दै. नवभारतचे महेश सचदेव यांचीच एकमताने पुन्हा एकदा निवडण्यात आली.
यावेळी लोकमतचे पुरूषोत्तम भागडकर, दै. नवराष्ट्र चे प्रा. दिलीप कहुरके, दै. भाष्करचे सचिन कुकडे, साप्ता. देसाईगंज समाचारचे संपादक जितेंद्र परसवाणी, दै. पुण्यनगरीचे रविंद्र कुथे, पंकज चहांदे, दै. लोकशाही वार्ताचे राहुल मेश्राम, साप्ता. लोकचर्चा चे संपादक हेमंत दुनेदार, दै. महासागरचे घनश्याम कोकोडे, कॅमेरामन अ. वहिद शेख आदी प्रेस क्लब सदस्य उपस्थित होते. लवकरच प्रेस क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.