बारा वर्षाच्या धम्मदिपची कँन्सरशी झुंज अखेर संपली….

 

शाळा आणि मित्राच्या आठवणीतच त्याने सोडला अखेरचा श्वास

आरमोरी… काळ कुणाला कधीच काही सांगून येत नाही. काळासमोर कुणाचेही टीकत नाही. हे सत्य आहे धम्म दीपच्या बाबतीत सुध्दा तेच घडले.., शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्पप्न बघणाऱ्या धम्मदिपला अर्ध्यावरती डाव सोडावा लागला. अवघ्या बारा वर्षाच्या वयात कॅन्सरच्या रूपाने काळ बनुन आलेल्या नियतीने त्याचा पिच्छा सोडलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून नागपुर येथे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या धम्मदिपला शेवटी नियतीसमोर हात टेकावे लागले. आणि गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली कॅन्सर शी सूरू असलेली झुंज अखेर संपली!…

नियमित शाळेत जाणारा धममदिपलाअगदी खेळण्या बागळण्याच्या वयात ब्लड कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराने ग्रासले. त्यामुळें त्याच्या पालकांनी त्याला नागपुर येथील संत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल केले होते . मात्र शाळेची आणि मित्राची ओढ लागली असल्याने दोन महिन्यांपासून नागपुर येतील रुग्णालयात भरती असताना त्याला शाळेची आणि मित्राची आठवण खूप सतावत होतो. मला शाळेत जायचे आहे. मित्रांना भेटायचे आहे. मला लवकर बरे करा अशी विनवणी तो डॉक्टर आणि आपल्या आई वडिलांकडे करीत होता. मात्र त्याची ती हाक नियतीला मान्य नव्हती आणि . अखेर शाळा आणि मित्राच्या आठवणीत त्याने शेवटचा श्वास सोडला.

देसाईगंज येथील आंबेडकर वार्डातील धम्मदिप देविदास सोरदे वय अवघे १२ वर्षे असून तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देसाईगंज येथे ६ व्या वर्गात शिक्षण घेत होता.वडील देविदास ,आई उषा सोरदे यांचा देसाईगंज येथे दररोज भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. धम्मदिप व यश अशी दोन मुले त्यांना होती.
धम्मदिप हा अभ्यासात हुशार असल्याने त्याला शिक्षणाची गोडी मोठ्या प्रमाणात होती . कराटे चँम्पियन म्हणून शाळेत, वर्गात त्याची ओळख धम्मदिप(कुलदिप) म्हणून प्रख्यात होती.सोबतच फावल्या वेळात तो आई-वडीलांच्या मदतीला भाजीपाला विकण्यासाठी दुकानात बसायचा.

अडीच महिन्याच्या अगोदर त्याचा पोटात दुखत असल्याने त्याला ब्रम्हपुरी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. नंतर त्याला उपचारासाठी नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँन्सर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
धम्मदिप ब्लड कँन्सर व स्टमक कँन्सरशी गेल्या दोन महिन्यांपासून झुंज देत होता.धम्मदिपला खूप वेदना होत होत्या.
त्या वेदनेत मला माझ्या शाळेची,मिञाची आठवण येत आहे मला लवकर दुरूस्त करा असा सुर डॉक्टर व आई-वडिलांना देत होता. शाळा आणि मित्र सुध्दा त्याच्या परत येण्याची वाट बघत होती.माञ नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. काळ बनून त्याच्या मागावर आलेल्या नियतीने अल्पावधीतच त्याला आपल्या कवेत घेतले . जसा पक्षी झाडावर बसतो. आणि भुरकन उडून जातो. तसेच धम्मदिपच्या बाबतीत घडले. अतिशय कमी वयात काळाने त्याला हिरावून नेले. आता उरल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी!….