अखेर कस्तुरबा वार्डाच्या हटवार काॅलनितील नाला सफाई सुरु

 

मुख्याधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

 

देसाईगंज-

शहरातील प्रतिष्ठित लोकांची वसाहत म्हणून कस्तुरबा वार्डातील हटवार काॅलनिकडे पाहिले जाते.मात्र वार्डातुन गेलेला सांडपाण्याचा निचरा करणारा नाला कचरा साचुन तुंबल्यामुळे वार्डात घाणिचे साम्राज्य पसरले असून असहाय्य दुर्गंधीमुळे अनेक समस्या आवासुन समोर उभ्या ठाकल्या आहेत.ही गंभीर बाब लक्षात घेता वार्डातील नाला तत्काळ साफ करण्यात यावा,अन्यथा विरोधात युवक काँग्रेसने माजी शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांच्या नेतृत्वात घेराव आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला होता.प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता अखेर नाला सफाईच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आली आहे.

शहराच्या कस्तुरबा वार्डातील नविन हटवार काॅलनितुन वाहणारा नाला मुख्य बाजारपेठ,मटन मार्केट,जुनी नगर परिषद ते रेल्वे क्रॉसिंग ओलांडून हटवार काॅलनितुन वाहात आहे. त्यामुळे तत्सम भागातील गाळ,कचरा पाण्यासोबत वाहात येऊन हटवार काॅलनितील नाला नियमित साफ करण्यात येत नसल्याने साचला असुन नाला तुंबल्यामुळे कचरा सडुन प्रचंड दुर्गंधी व घाणीने थैमान घातला आहे.

ऐन पावसाळ्यात कचरा साचुन तुंबलेल्या नाल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली असल्याने येथील लोकांचे,विशेष करून जेष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरात विविध आजारांची लागण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता तुंबलेला नाला तत्काळ साफ करून देण्यात यावा, अन्यथा विरोधात पिंकु बावणेच्या नेतृत्वात घेराव आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिला होता.नागरीकांची ही गंभीर समस्या लक्षा अखेर नाला सफाईच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

यावेळी काँग्रेस युवा नेते पिंकुभाऊ बावणे मनोज ढोरे जिल्हा ओबीसी सचिव सुधीर कवासे, मनीष खंडाईत, रुजेश्वर गहाणे, उद्देश मानापुरे, राजू निनावे, रामू कामथे, उत्तम निमजे, योगेश कापसे तसेच वार्डातील इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.