छञपती शिवाजी क्लब व ओबीसी समाज संघटनेचा संयुक्त उपक्रम
देसाईगंज-
दुषित वातावरणामुळे अनेकांना गंभीर आजार जळु लागले आहेत.धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक अपघातात गंभीर जखमी हैत असुन याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.अशात अनेकांना रक्ताची सक्त गरज पडते माञ वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना योग्य उपचाराअभावी जीव गमावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज येथील छञपती शिवाजी क्लब व ओबीसी समाज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतिचा या उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी अभावी गरीबीचे प्रमाण सर्वाधिक आहे.गंभीर आजारात रुग्णांना उपचार घेणे महागाडे होऊ लागले असताना वेळेवर गरजु रुग्णांना रक्त मिळणे कठीण जाते.अशात जिल्हाभरात एक हात मदतिचा या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजुंना वेळेत रक्त पुरवठा व्हावा यासाठी सातत्याने संघटना कार्यरत ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय उपचारांना देखील गती प्राप्त होणार असल्याने या उपक्रमात सातत्य ठेवणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी देसाईगंज ओबीसी समाज संघटनेचे शहराध्यक्ष सागर वाढई,माजी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे, जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे, अमोल मिसार,ज्ञानदेव पिलारे,गौरव शिलार,मोरु मोहुर्ले,शैलेश येलगंदावार, उज्जु मेश्राम आदी छञपती शिवाजी क्लब व ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.