८ जुन रोजी दमा औषध वाटपाची जय्यत तयारी

माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवारांची उपस्थिती

 

 

देसाईगंज-

 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांपासून असाध्य दमा सारख्या आजारावर कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या वतीने देण्यात येत असलेल्या नि:शुल्क दमा औषधीचे यावर्षी कोकडी ऐवजी देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणात वितरण करण्यात येणार आहे.औषधाचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन लाखोच्या संख्येने रुग्णांची गर्दी उसळत असल्याचे पाहु जाता येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यास्तव आयोजकांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असुन आयोजीत कार्यक्रमाला माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

मागील ४० वर्षापासून दमा सारख्या असाध्य आजारावर शाकाहारी रुग्णांना पाण्यातुन अथवा केळीतुन तर मांसाहारी रुग्णांना गणी, भुरभुसा यासारख्या बारीक मासोळ्यांतुन आयुर्वेदिक औषधे दिली जाणार आहे.औषधीचा खर्च, कार्यक्रमाचे नियोजन व येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळल्या जावी यासाठी कराव्या लागणाऱ्या पर्यायी उपाययोजना,याबाबत वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी स्थानिक काँग्रेसी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकित माहिती देण्यात आली.यावेळी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितिन राऊत,उद्योगपती दिनेश कुर्जेकर,काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे,मनोज ढोरे,

 

वैद्यराज प्रल्हाद कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.