अतिशय दुर्गंधी असलेला पाणी नळाद्वारे पुरवठा करणाऱ्या न. प. येथील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा राजू गारोदे यांची मागणी.

आरमोरी हा तालुक्यातील मुख्यलय असून संपूर्ण कार्यालयीन यंत्रणा आरमोरी येथून चालतात. परंतू तेथील स्थानिक निवासी हे मूलभूत गरजेपासून वंचित आहेत. महत्वाचे म्हणजे आरमोरी शहरवासियांना कायम पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. खास करून उन्हाळ्याच्या ऋतुत आरमोरीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागतो. कायम स्वरूपी असलेली मूलभूत गरज म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी येथील स्थानिकांना भटकंती करावा लागत असल्याचे अनुभव शासन प्रणालीतील शासन कर्त्यांना तसेच सत्तेत असलेल्या राजकारण्यांना माहिती असून देखील या मूलभूत विषयाचा आधार घेऊन मात्र केवळ राजकारण केला जात आहे.

गेल्या चार ते पाच दिवसापासून आरमोरी शहरात पिण्याचे पाणी नगर परिषद तर्फे पाईप फुटलेला असल्याचे कारण सांगून सोडण्यात आले नाही. मात्र तब्ब्ल चार ते पाच दिवसांनी सोडण्यात आलेल्या पाण्यात अतिशय दुर्गंधी असून गढूळ स्वरूपाचा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नगर परिषदच्या पाणी पुरवठा यंत्रनेला जुळलेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांचा स्थानिक निवासी जनतेकडून तीव्र रोष व्यक्त केला आहे. तब्ब्ल पाच दिवसांनी सोडण्यात आलेल्या पाण्याची दुर्गंधी ही गटर च्या पाण्यासारखी येत असून या पाण्याचे करायचे काय? असे प्रश्न स्थानिकाकडून उपस्थित केले जात आहेत. हा सर्व प्रकार यंत्रणेतील कामचुकार व अकर्तव्य कर्मचाऱ्यामुळे घडले असल्याने या कामचुकार कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सेलदल चे अध्यक्ष राजू गारोदे यांनी केली आहे.
आरमोरी ग्रामपंचायत सण 2019 मध्ये नगर परिषद म्हणून परिवर्तीत झाली. नगर परिषद च्या निवडणुकीवेळी सत्तेतील निवडून आलेल्यानी आपल्या योजना पत्रात आरमोरी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपणा तात्काळ निकाली लावू असे आश्वासन दिले होते. मात्र चार वर्षाचा सत्तेचा आस्वाद घेऊन देखील कोणतीही सुधारणा या प्रमुख विषयावर करण्यात आली नाही. आरमोरी ग्रामपंचायत नगर परिषद मध्ये विलगीत झाली असल्याने कोट्यावधी च्या निधी प्राप्त झाल्या मात्र प्रमुख विषय हा फक्त राजकारण करण्यासाठी जिवंत ठेवला असल्याचाही आरोप राजू गारोदे यांनी केला. या दुर्गंधीमय दूषित पाण्यापासून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यवर कोणताही आजार, विकार अथवा कोणताही आरोग्यमय अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? ही सर्व चूक नगरपरिषद च्या कामचुकार कार्यरत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचीच आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस सेलदल चे अध्यक्ष राजू गारोदे यांनी केली